Marathi Status | 1100+ बेस्ट मराठी स्टेटस
हल्लीच्या जगात सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल तर पटकन स्टेटस ठेवले जाते. तुमच्या पोस्टपेक्षाही स्टेटस अधिक लोकांपर्यंत पोहोचते. तुम्ही स्टेटस ठेवल्या ठेवल्या त्याचे नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाते आणि तुमची अधिक माहिती लोकांना कळते. त्यामुळे हल्ली सगळीकडेच सोशल मीडिया स्टेटसला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत बेस्ट मराठी स्टेटसचा Marathi Whatsapp Status संग्रह. जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस Marathi Status शोधत असाल तर आमचा हा मराठी स्टेटस संग्रह जरूर वाचा.
Marathi Status
अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.
गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.
तुमच्याकडे वेळ फार कमी आहे,
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.
यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.
हातावरच्या रेषा बदलायच्या असतील,
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर,
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.
ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.
समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.
पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.
तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.
वेळ आला आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.
आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा.
निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.
अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या,
कि अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल.
निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या
एका हत्यारानंही काम करू शकतो,
पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा
संच असूनही तो काम करू शकत नाही.
Marathi Whatsapp Status
मला इगो सोडायचाय
पण त्यातही इगो आड येतो.
ध्येय एवढं मोठे ठेवा की,
समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.
ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे
पण त्याची फी आपल्याला परवडत नाही.
जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर
मेंदू संपावर आहे हे नक्की.
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं
पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल पुढे टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
विषय किती वाढवायचा,
कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं
हे ज्याला जमते,
तो जगातील कुठल्याही
परिस्थितीवर मात करू शकतो.
त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका
ज्याने तुमच्यासाठी पूर्ण दुनियेला इग्नोर केलं.
जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे,
जर दिशा योग्य नसेल तर
वेगाचा काहीच उपयोग नाही.
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा
थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट?
कष्ट इतक्या शांततेत करावे
की यश धिंगाणा घालेल.
राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.
निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या नक्कीच संपतात.
एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.
मनातलं जाणणारी आई
आणि भविष्य ओळखणारा बाप
म्हणजे जगातील एकमेव ज्योतिष.
एकवेळ माणूस बोलून कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा.
अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.
माणसाला एखादी गोष्ट
करायची असेल तर मार्ग सापडतो,
आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.
बेस्ट मराठी स्टेटस संग्रह
जीवनात काही केलं नाही तरी चालेल
पण स्वतःवरचा विश्वास
मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.
जगणं सोपं आहे
फक्त काड्या करणाऱ्याच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.
जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता
तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.
जगात काहीच फुकट भेटत नाही
सल्ल्याशिवाय!
जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,
तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी
हजर राहण्याची.
आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात,
ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.
माणसाची नीती चांगली असेल तर
मनात भीती उरत नाही.
काय चुकलं हे शोधायला हवं
पण, आपण मात्र
कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.
यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,
पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.
माणूस म्हणतो,
पैसा आला की मी काही तरी करेन
पैसा म्हणतो,
तू काहीतरी कर मगच मी येईन.
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची
अजिबात पर्वा नसते.
आळशी माणूस
कामाच्या विचारानेही थकतो.
या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा.
मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो,
कारण कधी कधी गटारातले पाणी पण
आग विझवायचं काम करते.
चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या,
कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.
हातचे सोडून पळत्याच्या मागे
कधीही लागू नये.
डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर
नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.
समजूतदार लोक कधी भांडत नाहीत
फक्त आग लावून बाजूला होतात.
छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,
कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.
मी संकटाना कधीच शोधत नाही
पण त्यांनाच मी सापडतो.
पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की
नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.
काही नाही या शब्दामागे
खूप काही लपलेलं असतं.
fb Status Marathi
आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.
जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.
फक्त जिंकणारच नाही तर,
कधी, कुठे काय हरायचं
हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.
चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे
असतातच.
तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,
पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
बारशाला घरातले आणि
इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.
रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,
सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.
चांगल्या दिवसांची किंमत
वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
कळत नाही.
कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,
आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.
सोडून देऊ नका
कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात
शेवटची चावी त्या कुलुपाची असते.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे जास्त महत्वाचे असतात.
माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते
विश्वासघात करणाऱ्याला नाही.
जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.
संसार असाच असतो
लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून
चूल पेटवायची थांबवायचं नसतं.
जीवनात दरी निर्माण झाली म्हणून
आपण खोल खोल जायचं नसतं
ती दरी पार करायची असते.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने आलेले
हात वापरा.
खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा
समोर बादशाह असेल.
आजकाल बाईकवर मुलांच्या मागे
मुली अश्या बसतात जणू
विक्रमादित्याला वेताळ लटकला आहे.
आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,
कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,
तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.
मराठी स्टेटस
हृदयात खूप जागा होती
पण काय करणार काही लोकांना
डोक्यात बसायला जास्त आवडतं.
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते
तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता
तुमचा हात रिकामा करीत असते.
विश्वास इतरांवर इतका करा की
तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.
जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.
प्रत्येकाने आपल्या चुकांना
दिलेलं नाव म्हणजे अनुभव.
काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी
सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.
नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की
हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
कधी कोणाला समजवायचा
प्रयन्त करत बसू नका,
कारण माणसं तेवढंच समजतात
जेवढी त्यांची कुवत असते.
जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या
गोष्टी विकत घेत असाल,
तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी
विकण्याची वेळ येणार आहे असं समजा.
नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर
कायमस्वरूपी नसतो,
काळ संपला की पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो.
खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो,
खरा योद्धा तो आहे जो नेहमीच लढायला
तयार असतो.
मन मोकळे असणे कधीही चांगले,
परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका.
हातपाय न हलवता मिळालेल्या
पैश्याला लगेच पाय फुटतात.
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
पण सुरवात माझ्यापासून कर.
स्वतः ठाम रहा,
कोणाचेही अनुकरण करू नका.
आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत
तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत
तुम्ही हे कसं केलंत.
ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले
त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,
स्वतःला दोष द्या कारण
तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.
कल्पनांना सत्यात उतरविण्याची
ज्यांच्यात धमक असते,
त्यांना कोणीच रोखू शकत नाही.
Facebook Status Marathi
हरण्याची काळजी अन जिंकण्याची
महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून
लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो
आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.
मी पाहिलंय, मला ते हवंय,
मी त्यासाठी मेहनत करणार
आणि ते मी मिळवणारच.
स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं
अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.
जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
जेव्हा काही माणसांना
तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं
वाईट सांगायला सुरवात करतात.
सुखात असताना समजून घेणारे खूप असतात,
पण दुःखात असताना जो समजून घेतो
तोच आपला असतो.
लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात,
तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगाल.
सोन्याची पारख सोन कापून,
घासून आणि तापवून होते.
माणसाची पारख गुणाने,
त्यागाने आणि चारित्र्याने होते.
जेव्हा तुम्हाला कुमकुवत पणा जाणवेल
तेव्हा सामर्थ्यवान व्हा.
जेव्हा घाबराल तेव्हा हिमंतवान व्हा,
आणि विजयी असतांना नम्र व्हा.
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.
स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या,
नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची
इमारत बांधायला कामाला ठेवेल.
कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा
तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा.
नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला
असला तरी नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.
हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.
नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा
कारण सोनाराचा कचरा सुद्धा
वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.
Whatsapp Status in Marathi
आयुष्य हे कवड्यांच्या खेळाप्रमाणे असते
तुमचा आवडता अंक नाही आला,
तर पुन्हा खेळावेच लागते.
ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,
त्यांचा मी खूप आभारी आहे;
त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी
स्वतः करू शकलो.
थेंब कितीही छोटा असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची धमक असते.
प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असावा.
मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते,
कमावलेली नाही,
आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात,
मागण्यासाठी नाही.
सगळे कागद सारखेच असतात,
फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं
सर्टिफिकेट होऊन जातं.
ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची
पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.
तुमच्या चाली रचण्याआधीच
त्या जाहीर करू नका.
यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो.
पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते.
कोणतेही यश अपयश हे आपण
घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.
तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,
तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदरानं झुकतात.
पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,
पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही
खरी शोकांतिका आहे.
जी माणसं निश्चयी असतात
त्यांना काहीच अशक्य नसतं.
लोक काय म्हणतील?
पहिल्या दिवशी हसतील,
दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील,
तिसऱ्या दिवशी विसरून जातील,
त्यामुळे लोकांचा विचार करू नका.
तुम्हाला जे करायचंय तेच करा.
प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत
यावर आपण जास्त भर दिला पाहिजे.
सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,
असा विचार केला तर तुम्ही कधीच
प्रारंभ करू शकणार नाही.
रॉयल मराठी स्टेटस
व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.
पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल असे बोलू नये.
रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर;
रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते.
लोकांना वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही;
त्यालासुद्धा दुःख होतं,
तो त्यांना सामोरा जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन
आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.
माणसाला अलार्म नाही,
तर जबाबदाऱ्या जागं करतात.
जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.
माणसानं स्प्रिंगसारखं असावं,
जेवढं दाबलं जाईल,
तेवढं उसळून वर यावं.
जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत,
त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.
यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो,
यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.
अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल,
अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील,
तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.
पैश्याचा पाठलाग करू नका,
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते,
तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.
श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका
क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते.
अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,
कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक
नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.
प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते,
कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन
दवाखान्यात खूप महाग विकला जातो.
होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा,
पुढे काय करायचंय याचा विचार करा.
Marathi Caption for Instagram
अशक्य काम शक्य करण्यात एक
वेगळीच मजा आहे.
कोणताही बिजनेस छोटा नसतो,
छोटी असते आपली मानसिकता.
तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील
तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत.
जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,
मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.
जगासमोर हरलात तरी चालेल
पण स्वतःच्या मनात स्वतःला
कधीही हरलेलं समजू नका.
जर तुम्हाला महान बनायचं असेल,
तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे
जगणे सोडून द्या.
आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.
आयुष्यात खूप काही मिळतं,
आपण तेच मोजत बसतो
जे मिळालं नाही.
जीवनात तेच लोक यशस्वी होतात,
ज्यांना बघून लोकांना वाटतं
हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात,
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
जगण्यासाठी काम करा
फक्त काम करण्यासाठी जगू नका.
जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.
प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत.
एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी
खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.
तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने
जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.
तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.
वर्तमानात राहून भविष्याचा विचार
करायला शिका.
संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे,
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.
हातात हात घेतला तर मैत्री होते,
दोन्ही हात जोडले तर भक्ती होते,
कुणाला हात दिला तर मदत होते,
हाताचे महत्व इतके कि अनेक हात
पुढे आले तर अशक्य ते शक्य होते.
जीवनातील सर्वात मोठे सत्य हे आहे की
भूतकाळ बदलता येत नाही. त्यामुळे
आयुष्यातील पुढचा क्षण यशासाठी घालवा.
चव गोड हवी असेल तर
चटका सहन करावाच लागतो
मग तो चहाचा असो कि आयुष्याचा.
नाचणारा मोर आणि पैशांचा जोर
कायमस्वरूपी नसतो,
काळ संपला कि पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो.
वेळ आपल्याला आपल्यासोबत
काहीही घेऊन जाऊ देत नाही
परंतु आपल्या मागे काहीतरी
अमूल्य सोडण्याची संधी देते.
हे हि वाचा : Birthday Wishes in Marathi
मित्रांनो जर तुम्हाला हा Marathi Whatsapp Status बेस्ट मराठी स्टेटस संग्रह आवडला असेल तर जरूर शेअर करा व आम्हाला Twitter, फेसबुक, Pinterest व इंस्टाग्राम वर जरूर फॉलो करा.