Birthday Wishes in Marathi | 1100+ वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये
खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. वाढदिवशी आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो. नात्यातले प्रेम द्विगुणित करणारा असतो. वाढदिवस म्हंटला की शुभेच्छा आल्याच. ज्याचा वाढदिवस असतो त्या आपल्या लाडक्या व्यक्तीला आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सगळीकडून हार्दिक शुभेच्छांचा जणू वर्षाव सुरू असतो. त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 1100 पेक्षा जास्त Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना मराठी मध्ये.
Happy Birthday Wishes in Marathi
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी,
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की,
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की,
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो,
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो,
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो,
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच.
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Best Friend Birthday Wishes in Marathi
नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला!
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो..
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Birthday Wishes for Brother in Marathi
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!
Birthday Wishes for Sister in Marathi
देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे.
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई !
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात.
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.
तूच आम्हाला धीर देतेस..
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास.
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला.
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
वाढदिवस शुभेच्छा मराठी
चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना.
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Birthday Wishes for Wife in Marathi
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
a सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट,
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट!
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात.
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा.
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा..
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना.
संकल्प असावेत नवे तुझे.
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा.
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
Birthday Wishes for aai in Marathi
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं.
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो.
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा.
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.
जन्मापासूनच जिम चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल
समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या
सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेड
वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes for Friend in Marathi
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव.
Happy Birthday Mitra.
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत..
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण.
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes For Son in Marathi
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी मनात घर
करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे
साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं
कारण ते असतात आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद.
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा
स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लू.
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.
आमचे लाडके भाऊ
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
आमच्या गावची शान
हजारो लाखो पोरींची जान असलेले
अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे
असे आमचे खास लाडके मित्र यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
प्राणाहून प्रिय बायको,
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहेे,
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे.
काळजाच्या या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
भाऊ नी राडा येवढा केलाय की
भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा.
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे,
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.
आई नंतर जर तुमच्यावर
जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल
तर ती तुमची बहीण असते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
स्माईल हिची खास
तर कधी ऍटिट्यूड पन झक्कास
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास
कधीमधी आवडीने सवडीने बोलनारी
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी
व्हाट्स अँप चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या गालात हसणारी
आणि विशेष म्हणजे भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी
थोडीशी रागीट थोडीशी प्रेमळ
चेहेऱ्यावर कायम स्माईल आसणारी
असो आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा
सुंदर गोड फुलाप्रमाणे फुलत रहा
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा
नेहमी हसत आनंदी रहा.
Birthday Wishes for Mother in Marathi
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो,
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखत हि नसतो,
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी.
आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास.
माझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण
माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता
कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,
वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !
आजचा दिवस खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
आई माझी सर्वप्रथम गुरू
तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
Birthday Wishes for Daughter in Marathi
आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देवानेही उत्सव बनवला असेल,
ज्या दिवशी तुला बनवले असेल,
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.
अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांहूनही श्रेष्ठ मला माझी आई.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
आई तुला उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा.
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो नाही असं नाही
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स! आणखी काही नको.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस गं,
पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
बाबांचा मला कळलेला अर्थ,
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून
मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes for Father in Marathi
तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे
आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा.
कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस
म्हणजे वडील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हैप्पी बर्थडे डिअर.
आपले लाडके, गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे डॅशिंग बॉय
या नावाने प्रसिद्द असलेल्या
आपल्या रॉयल भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे
तुझे कष्ट अपार आहेत
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा
हेच आता देवाकडे मागणे आहे
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाद झाला तरी चालेल पण
भावाच्या बर्थ डे ला DJ
लावून नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीचा रंग वहिनी, मैत्रीची चाहूल वहिनी
प्रेमाचे बोल वहिनी, रस्त्यातील वाट वहिनी
मायेची सावली वहिनी, मातीची थाप वहिनी
ओये हिरो म्हणून काम सांगणारी वहिनी
बहिणीची आस पुरवणारी वहिनी
पाकळ्यांचे फुल वहिनी, हृदयातील आवाज वहिनी
अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes for Husband in Marathi
तुझ्या वाढदिवसाची ची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते
आणि तुला हे दाखवून द्यावेसे वाटते कि
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
हॅपी बर्थडे माय लव.
तुझा स्पर्श होताच जाणीव होते
मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ
लागते मला तुला पुन्हा भेटण्याची.
Happy Birthday Dear.
तुला कोणी पाहिलंतर जीव माझा जळतो
जगापासून कुठे लपवू मग हा विचार मला पडतो.
Happy Birthday Sweet Heart.
आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Vadhdivsachya Hardik Shubhechha
माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान.
आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे,
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.
Happy Birthday Jaan!
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही माझ्या जीवनात आलेली
सर्वात चांगली गोष्ट आहात!
मला इतके हास्य, इतके आनंदी
आणि खूप-खूप प्रेम देऊन
तुम्ही माझं जीवन फुलवलं.
आपल्या वाढदिवशी मला तुम्हाला
धन्यवाद द्यायला आवडेल
आणि मी आठवण करून देऊ इच्छित आहे
कि, मी तुमच्यावर खूप-खूप प्रेम करते.
वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा!
तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Heart Touching Birthday Wishes in Marathi
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि
तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन:
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली.
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो.
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास.
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
साहस, मजा आणि नवीन अनुभवाचे
आणखी एक वर्ष तुमची वाट पाहत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत!
आज तुमचा खास दिवस आहे!
प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि
काही अविस्मरणीय आठवणी बनवा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्याच्या आकाशात
ढग असेही दाटून येतील,
कधी सुखांची हलकी रिमझिम
कधी दुःख घनदाट बरसतील
सुख दुःखाचे थेंब हे सारे,
स्वछंद झेलत रहा.
आयुष्याची आव्हाने सारी
अशीच पेलत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
कित्येकदा मांडलेले,
कित्येकांत विस्कटते.
नवे डाव मांडता मांडता,
हातून बरेच काही निसटते.
जे मिळवले ते आपले,
हरवले ते नियतीचे.
उरले सुरले घेउनी तारे
आकाश आपले सजवायचे.
कधी न थकता कधी न थांबता
पुढे पुढेच चालत रहायचे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाभो तुंम्हा समृध्दी सुख समाधान,
फुलत जावो तुमचे जीवन फुलासमान,
आनंदाचा सुगंध मिळो तुमच्या जीवना,
लाभो तुंम्हा दिर्घ आयु हिच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभ कामना,
लाभो तुम्हा दिर्घ आयु हिच प्रार्थना.
पुन्हा पुन्हा दिवस येवो असा आनंदाचा,
वर्षाव होण्या तुंम्हावर शुभेच्छांचा,
पुर्ण करो देव तुमची सर्व मनोकामना,
लाभो तुंम्हा दिर्घ आयु हिच प्रार्थना.
जीवनातील सर्वस्वप्न तुमची पुर्ण व्हावी,
पुढील आयुष्याची वर्षं सुखात जावी,
हिच ईश्वर चरणी माझी याचना,
लाभो तुंम्हा दिर्घ आयु हिच प्रार्थना.
वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा,आईबाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाकडून बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वहिनीसाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा, गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरासाठी, वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा, 50 व्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा पण उशिराने.
हे हि वाचा : शुभ सकाळ शुभेच्छा.
मित्रांनो जर तुम्हाला Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छांचा खजिना आवडला असेल तर जरूर आपल्या प्रिय व्यक्ती सोबत शेअर करा. आम्हाला Twitter, फेसबुक, Pinterest व इंस्टाग्राम वर फॉलो करा.